Saturday, 21 September 2013

इलेक्ट्रॉनिक्स मीटर त्वरीत बसवून घ्यावे -- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी



ऑटोरिक्षा चालक / मालकांनी दंडात्मक कार्यवाही टाळण्यासाठी
 इलेक्ट्रॉनिक्स मीटर त्वरीत बसवून घ्यावे
                      --उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
                 जळगाव, दि. 21 :- राज्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आले असून जळगाव शहरातील सर्व नवीन परवानाधारक ऑटोरिक्षाना दिनांक    1 जानेवारी 2012 व जुन्या परवानाधारक ऑटोरिक्षाना दिनांक 1 जुलै 2012 पासून इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे.
          उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहरातील परवानाधारक ऑटोरिक्षाची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान ऑटोरिक्षाना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले नसल्याचे आढळून आल्याने संबंधीत वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येवून अशा वाहनधारकाकडून सुमारे 3 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
         भुसावळ शहरातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून सदर मोहीमे दरम्यान ऑटोरिक्षाची इलेट्रॉनिक मीटर, अवैध गॅसकिट, फिटनेस, परमीट, इन्श्युरन्स बाबत तपासणी करण्यात येणार आहे. ऑटोरिक्षाचे कागदपत्र वैध नसल्याचे आढळून आल्यास अशा वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येवून ऑटोरिक्षा जप्त करण्यात येणार आहे.
         सदर कार्यवाही टाळण्याकरिता सर्व संबंधित मालक / चालक यांनी आप आपल्या ऑटोरिक्षाना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवून पासिंग करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment