Friday, 13 September 2013

कृषी आधारीत उद्योगांसाठी शेतक-यांना मार्गदर्शन



कृषी आधारीत उद्योगांसाठी
शेतक-यांना मार्गदर्शन
         जळगाव, दि. 13 :- केंद्र शासनाच्या अर्थ सहाय्याने छोटया शेतक-यांच्या कृषी व्यापार संघामार्फत ( S F A C) शेतक-यासाठी  कृषी आधारीत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी एका कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अल्पबचत भवन येथे सदर कार्यशाळा पार पाडली कार्यशाळेला कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी कृषी व्यापार संघाचे श्री. चंद्रप्रकाश शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रस्तुत योजनेत उभारता येणारे उद्योग, त्यासाठी शेतकरी, समुह महिला बचत गट अशांनी कशाप्रकारे प्रकल्प तयार करावा, उभारावयाचे अर्थसहाय्य याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या अखेरीस शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
            प्रास्ताविक संभाजी ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन के. डी. महाजन यांनी केले. याप्रसंगी गोपाळ पाटील, नाबार्डचे गोरख सोमवंशी, अनिल भोकरे, आदी उपस्थित होते., कार्यशाळेत शेतकरी महिला बचत गट सदस्या, उद्योजकांनी सहभाग घेतला.
                                                              0000000
वृत्त क्र.  -607                                                                              दिनांक -13 सप्टेंबर,2013
16 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन
           जळगाव, दि. 13 :-  जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2013 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यांत आलेला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                                                      
                                                                    00000
वृत्त क्र.  -608                                                                                 दिनांक -13 सप्टेंबर,2013
15 सप्टेंबर रोजी माजी सैनिक मेळावा
         जळगाव, दि. 13 :-  जळगाव जिल्हयातील माजी सैनिकांसाठी रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 10.00 वाजता स्टेशन हेडक्वॉर्टर, भुसावळ येथील फाल्कन हॉल येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.
         या मेळाव्यास ब्रिगेडिर अजित कपुर कमांडर 98 ब्रिग्रेडर  हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास मेजर लिमये, ॲडम कमाडंट कर्नल व्होरा, कर्नल बिष्णोई, कर्नल मुखर्जी वरीष्ठ सैन्य अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सदर मेळाव्यामध्ये माजी सैनिकांना विविध आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणार असून वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांच्याही सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिकांनी 10.00 वाजता भुसावळ स्टेशन हेडक्वॉर्टर मध्ये उपस्थित रहावे. भुसावळ रेल्वे स्टेशन व गांधी पुतळा, तापी रोड, भुसावळ येथुन स्टेशन हेडक्वॉर्टर येथे जाण्यासाठी स्टेशन हेडक्वॉर्टर तर्फे वाहनांची सोय करण्यात आली आहे उपस्थितीचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दी पत्रकन्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment