Wednesday, 25 September 2013

पाणी वापर संस्थांसाठी पुरस्कार



पाणी वापर संस्थांसाठी पुरस्कार
                 जळगाव, दि. 25-  महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियानांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वlपर संस्था पुरस्कार स्पर्धा प्रवेश व राज्यस्तरावर घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पुरस्काराची रक्कम याप्रमाणे आहे. प्रादेशिकस्तर पुस्कार प्रथम क्रमांक रुपये 3 लाख व प्रशस्तीपत्रक, व्दितीय क्रमांक रुपये 2 लाख व प्रशस्तीपत्रक, राज्यस्तर पुरस्कार प्रथम क्रमांक रुपये 7 लाख व प्रशस्तीपत्रक, व्दितीय क्रमांक रुपये 5 लाख व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांक रुपये 3 लाख व प्रशस्तीपत्रक या स्पर्धेसाठी पाणी वापर संस्थांकडून विहित नमुन्यात नामांकने मागविण्यात आली आहेत. इच्छूक पाणी वापर संस्थांनी कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्याकडे नामांकने दाखल करावीत. नामांकन माहितीचे प्रपत्रे उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग, यावल, चोपडा, पाचोरा जि. जळगाव येथे उपलब्ध आहेत. इच्छूक संस्थांनी आपली नामांकने विहित नमुन्यात 15 ऑक्टोबर 2013 पर्यंत दाखल करावीत असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

* * * * * * * * *

No comments:

Post a Comment