Friday, 13 September 2013

विभागातील 12 प्रयोगांची केंद्रीयस्तरावर निवड



             जळगाव, दि. 13 :- फैजपुर ता. यावल येथील धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित नाशिक शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय इनस्वायर ॲवार्ड विज्ञान प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत सहभागी झालेल्या 228 पैकी 12 प्रयोगांची केंद्रीयस्तरावरील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.     राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हे निकाल आज जाहीर झाले. डॉ. सुधीर मेश्राम, कुलगरु उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व जळगाव जि.प. अध्यक्ष श्री. दिलीप खोडपे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
            राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिसद यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन दि. 11 ते 13 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले. या प्रदर्शनात नाशिक जिल्हयातील 114, जळगाव 75, धुळे 21 तर नंदुरबार जिल्हयातुन 19 विद्यार्थ्यानी आपले प्रयोग सादर केले. एकूण 228 प्रयोगापैकी 12 प्रयोगाची केंद्रीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
            निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे प्रयोग याप्रमाणे - जळगाव जिल्हा सी. बी. निकुंभ हायस्कूल, घोडगाव ता. चोपडा, कु. दिपराज विश्वास पाटील, इ. 7 वी, मॅनेजमेट ऑफ वेस्ट शारदा माध्यमिक विद्यालय खर्डी शरद गोरख पाटील इ. 10 वी सोईग बॉय सायकल, धुळे जिल्हा सी. व्ही. देवरे माध्यमिक विद्यालय मराठी ता. साक्री, चि. देवरे ज्ञानेश सुभाष इ. 8 वी, मल्टी पर्पज ॲग्रीकल्चर मशिन,  के. एस. मुलींचे हायस्कूल, धुळे  लिना अरुणकुमार मोरे इ. 9 वी प्रॉडेक्ट ऑफ चॉकलेट ॲड चपाती फॉर्म पेरी कार्ड, हस्ती पब्लीक स्कुल दोंडाईचा ता. शिंदखेडा अभिजीत समिर देवधर इ. 8 वी, फिंगर फ्रिट टेक्नॉलॉजी नाशिक जिल्हा न्यू इंग्लीश स्कूल यकेद  ता. इगतपूरी जयेश राजेंद्र गायकवाड, ॲटोमॅटीक रेल्वे गेट, आर. पी. विद्यालय, नाशिक हेमांगी रतीलाल पवार इ. 10 वी डिटेक्शन ऑफ इम्प्युअर इंजिन ऑईल, जि. प. शाळा वेळूजे, हर्षवर्धन नानासाहेब काशिद इ. 10 वी मल्टी पर्पज बिल्डींग ॲड सोलर एनर्जी बेस वॉटर मॅनेजमेंट, माध्य आश्रमशाळा रामनगर ता. सिन्नर विशाल वासुदेव नवारे इ. 8 वी एक्ट्राशन ऑफ इरवल पॉन्ट, जनता इग्लीश स्कुल, जायखेडा गौतमी यशवंत धिवरे, हॅट्रोजेल फाम्रिंग जनता विद्यालय वरखेडा ता. दिंडोरी, योगेश उत्तम ऊफाडे, डिटेक्शन ऑफ फौल्ट इज स्ट्रीट लाईट सिस्टीम
           या निमित्ताने आयोजित पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे कृषी पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे, डॉ. सुधीर मेश्राम, कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, शिक्षण उपसंचालक टी. एन. सुपे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. एस. जी. पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. शशिकांत हिंगोणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
             यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री सावकारे म्हणाले की, विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची चालना देण्यासाठी या उपक्रमाचा खुप चांगला उपयोग होत आहे. देशाचे भावी शास्त्रज्ञ यातुनच घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            निवड झालेले प्रयोग 8 ते 10 ऑक्टोंबर 2013 या कालावधीत के. एफ. मुलींचे हायस्कुल, आझाद मैदान, नवी दिल्ली येथे प्रदर्शनास सादर केले जातील, अशी माहिती यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविकात दिली.

No comments:

Post a Comment