जळगाव, दिनांक 24 डिसेंबर (जिमाका)
: आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य
रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील प्रवेशासाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता
६वी च्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याची स्पर्धा परिक्षा घेवुन गुणानुक्रमे
३० मुले व ३० मुली या प्रमाणे प्रत्येक एकलव्य स्कुल मध्ये प्रवेश देण्यासाठी तसेच
इयत्ता ७वी ते ९वी च्या वर्गातीन अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या व आदिम
जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दिनाक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी परिक्षा होणार आहेत. या परिक्षा देण्यासाठी
विद्यार्थ्यांना दिनांक १० जानेवारी २०२५ पर्यंत आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत
यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता.अमळनेर,
जि.जळगाव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता.जामनेर, जि.जळगांव या दोन परिक्षा
केंद्रावर स्पर्धा परिक्षा रविवार दिनांक २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी इयत्ता ६ वीच्या
सकाळी ११ ते ०१ यावेळेत आणि इयत्ता ७वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते ०२ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सन २०२४-२५ या
चालू शैक्षणिक वर्षा मध्ये इयत्ता ५वी च्या वर्गात शिकत असून, परीक्षेला बसलेले आहेत
व पूढील वर्षी इयत्ता ६वी मध्ये तसेच ७वी ते ९वी मध्ये प्रवेश घेणार आहेत अशा इच्छुक
विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत. अर्जाचा नमुना यावल प्रकल्प कार्यालय तसेच मुख्याध्यापक
व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहे.
या परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा,
जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले
इयत्ता ५वी पास ते ९वी च्या विद्यार्थ्यां करीता पूर्णतः खुली आहे. या परिक्षेकरिता
विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. सहा लाखाच्या आत असावे, तसेच पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे, अर्जासोबत
सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे,
अनुसूचित जमातीतील अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
५ टक्के जागा आरक्षित राहणार आहे, तरी जास्तीत-जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी
या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत.
No comments:
Post a Comment