जळगाव, दिनांक 23 डिसेंबर ( जिमाका ) : जामनेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलल्या वाहन मालकाविरुध्द दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र ज्या वाहनांच्या मालकांनी दंडाची रक्कम अदयापावेतो जमा केलेली नाही अशा वाहनांचा जामनेर येथील तहसिल कार्यालयात २६ डिसेंबर 2024 रोजी सकाळी ११.०० वाजता लिलाव करण्यात येणार आहे.
तसेच जमीन महसूलाची थकबाकीची रक्कम शासनास चलनाव्दारे जमा न केल्यामुळेधर्मराज शशीकांत पाटील, अविनाश उर्फ पिंटु शंकर सोनवणे हॉनेस्ट डेरीव्हीटीज प्रा.लि.चे डायरेक्टर राजरतन बाबुलाल अगरवाल यांच्या स्थावर मालमत्ता शासन जमा करण्यात आलेल्या आहे.
दंडाची/ जमीन महसूलाची थकबाकीची रक्कम वसुली करण्यासाठी या मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय येथे ठेवण्यात आला आहे. ज्या कुणाला ही मालमत्ता घ्यायची असतील त्यांनी 15 जानेवारी 2025 रोजी सांयकाळी ०५ वाजेपावेतो तहसिल कार्यालय संपर्क साधावा असे आवाहन जामनेरचे तहसिलदार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment