Monday, 23 December 2024

महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा विषयक अडचणी सोडविण्यासाठी संवाद कार्यक्रम संपन्न

 




जळगाव, दिनांक 23 डिसेंबर ( जिमाका ) : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून लोकशाही दिनाच्या धर्तीवर महसुल विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडचणी सोडविण्यासाठी आज दिनांक २३/१२/२०२४ रोजी दुपारी ०४.०० वाजता संवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
त्यात शासकीय सेवेत कामकाज करत असतांना अधिकारी / कर्मचारी यांच्या स्वतःच्या सेवा विषयक बाबी दुर्लक्षीत राहतात. त्यामुळे पदोन्नती, सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास विलंब होतो. त्याअनुषंगाने अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडचणी सोडविण्यासाठी दिनांक २३/१२/२०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे मोहिम स्वरुपात संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,निवासी उपजिल्हाधिकारी, भिमराज दराडे, तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय श्रीमती ज्योती गुंजाळ हे उपस्थित होते. याबरोबर महसूल कर्मचारी संघटना/तलाठी कर्मचारी संघटना/शिपाई कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात कर्मचा-यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पात्र अधिकारी/कर्मचारी यांना प्रातिनिधीक स्वरुपात कालबध्द पदोन्नतीचे आदेश समक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन नायब तहसिलदार (महसूल) अंगद आसटकर यांनी केले. असा नाविन्यपुर्ण उपक्रम जळगाव जिल्हयात प्रथमच राबविण्यात आलेला आहे. याबाबत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment