Wednesday, 18 December 2024

"अंतर्गत तक्रार समिती" मार्फत "महिला लैंगिक छळ विरोधी कायदा" या विषयावर कार्यक्रम संपन्न


जळगाव, दिनांक 18 डिसेंबर (जिमाका) : जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयाच्या अनुषंगाने " अंतर्गत तक्रार समिती" गठीत करण्यांत आलेली आहे. या समितीमार्फत "महिला लैंगिक छळ विरोधी कायदा" आणि "कायदयाच्या अनुशंगाने कार्यालयीन वर्तवणूक व व्यवस्थापन" या दोन विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
अॅड. मंजुळा मुंदडा आणि श्रीमती सुचित्रा महाजन यांनी कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. मंजुळा मुंदडा यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महिला लैंगिक छळ विरोधी कायदयाबाबत मार्गदर्शन करुन कायदयाची जाणीव करुन दिली. तसेच कायदयाच्या तरतूदी व कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती महाजन यांनी कायदयाचे अनुषंगाने कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात कार्यरत असतांना आपली वर्तवणूक / शिस्त कशी असावी, कार्यालयीन वातावरण चांगले कसे राहील आणि त्यासाठी कशा पध्दतीने नियोजन / व्यवस्थापन ठेवावे याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली.

No comments:

Post a Comment