Thursday, 5 December 2024

सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम ९ डिसेंबरला होणार साजरा

        जळगाव, दिनांक 05 डिसेंबर (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन- २०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येणार आहे. येत्या ९ डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी १०:०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

तरी जिल्हयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वीर पत्नी, वीर माता-पीता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबीत यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन- २०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन जळगावचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश प्रकाश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment