Thursday, 5 December 2024

विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी हयातीच्या दाखला व इतर कागदपत्रे तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन


जळगाव, दिनांक 05 डिसेंबर (जिमाका) : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजना / श्रावणबाळ योजना / इंदिरा गांधी योजने अंतर्गत शासनाने लाभार्थांना ऑनलाईन सुविधे अंतर्गत अनुदान वितरीत करण्याचे निश्चिन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने MAHADBT या पोर्टलवर ऑनलाईन डाटा एन्ट्री सुरु आहे.
ज्या लाभार्थ्याचे आधारकार्ड बैंक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर प्राप्त झालेला आहे. त्यांची डाटाएंट्री पूर्ण झाली आहे. उर्वरीत सर्व लाभार्थ्यांचे आधारकार्ड, बैंक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबरची माहिती जमा करण्याचे काम जळगाव येथील तहसिलदार कार्यालयामार्फत सुरु आहे.
तरी लाभाथ्यर्थ्यांनी या तहसिलदार संजय गांधी योजना कार्यालयात जमा केलेल्या बँक खात्यासोबत तसेच आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक करुन हयातीच्या दाखला, मोबाईल नंबर सह कागदपत्रे या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन तहसिलदार अनिल पुरे यांनी सर्व लाभाथ्यर्थ्यांना केले आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र सादर होतील त्यांनाच अनुदान वितरीत करण्यात येईल असे देखील तहसिलदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment