जळगांव, दि. 25 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 53 व्या वर्धापन
दिनानिमित्त दि 1 मे 2013 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहणाचा
मुख्य समारंभ पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते होणार आहे. तरी सदर समारंभास
मान्यवर, नागरिक विदयार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वर्धापन दिन साजरा करणेबाबतच्या बैठकीत
जिल्हाधिकारी राजूरकर बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. एस.एन. लाळीकर,
अप्पर पोलिस अधिक्षक एन. अंबिका, तहसिलदार
कैलास देवरे , उपअभियंता श्री. फेगडे, श्रीमती बढे, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,
मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील आदि उपस्थित होते.
राज्य
स्थापनेचा 53 वा वर्धापन दिनाचा समारंभ साजरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,
पोलिस विभाग, महापालिका आरोग्य विभाग, जळगांव तहसिल कार्यालय, जिल्हा शल्य
चिकित्सक , क्रीडा कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आदि विभागांकडे देण्यात आलेली
जबाबदारी योग्य व काटेकोरपणे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी
केली
तसेच
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज वंदन कार्यक्रम सकाळी 7.10 वा. आयोजित करण्यात आलेला
आहे.
No comments:
Post a Comment