Friday, 12 April 2013

आंबेडकर जयंतीच्या दिवशी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश



       जळगांव,दि.12 :- जळगांव जिल्हयात दिनांक 14 एप्रिल 2013 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जाणार आहे. मदयपीच्या गैरवर्तणूकीमुळे या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये, सामाजिक सलोखा राहावा तसेच या कालावधीत जळगांव जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जिल्हाधिकारी जळगांव यांनी दिनांक 14 एप्रिल 2013 रोजी जळगांव जिल्हयातील सर्व देशी / विदेशी मदय विक्रीची दुकाने , परमिटरुम, बिअर शॉपी व ताडीची दुकाने पुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
           सदर आदेशाचे अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. उपरोक्त आदेशाची उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment