Monday, 8 April 2013

मा. उपराष्ट्रपती यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



            जळगांव, दि. 8 :- मा. उपराष्ट्रपती श्री. मो. हमीद अन्सारी यांचा दिनांक 9 एप्रिल 2013 रोजी जळगांव जिल्हा दौरा असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे --
         मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12.45 वाजता जळगांव विमानतळावर आय.ए. एफ. च्या विशेष विमानाने आगमन, 12. 50 वाजता जळगांव विमानतळावरुन अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.10 वाजता अजिंठा विश्रामगृह येथुन उत्तर महाराष्ट्र विदयापीठाकडे प्रयाण, दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यत विद्यापीठात होणा-या 21 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, सायं. 5 वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून जळगांव विमानतळाकडे प्रयाण व सायं 5. 20 वाजता विमानतळावरुन आय. ए. एफ. च्या विशेष विमानाने पुणेकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment