जळगांव, दि. 12 :- समस्याग्रस्त व पीडीत
महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण
होवून त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी / अडचणी यांची शासकीय
यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा
उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा
स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या
सोमवारी राबविण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने सोमवार दि. 15 एप्रिल
2013 रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन मा. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिक 11.00
वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सदर
बाबींचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment