जळगांव, दि. 25 :- सामाजिक, आर्थिक व जात
सर्वेक्षण 2011 अंतर्गत जिल्हयात जामनेर, भडगांव व मुक्ताईनगर, भुसावळ, पारोळा व
भडगांव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागामधील सवैक्षणाचे काम अत्यंत मंद गतीने सुरु
आहे. तरी सदर सर्वेक्षसणाचे काम संबंधीत शासकीय अधिकारी व बेल कंपनीच्या
अधिका-यांनी परस्परांत समन्वय ठेवनू आठ दिवसात काम पूर्ण करण्याची सूचना
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात आज दुपारी आयोजित सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी
सहाय्यक प्रकलप संचालक अनिल भोकरे, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, मुख्याधिकारी
सर्वश्री बी. टी. बावीस्कर, किरण देशमुख, प्रभाकर सोनवणे, सोमथ्नाथ शेटे, गट विकास
अधिकारी सी. जी. सुनील दुसाने, राजेश पाटील, श्री. मोरे आदिसह बेल कंपनीचे
इंजिनिअर श्री. सोनार, श्री. शशांक व श्री. प्रजापती आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
राजूरकर म्हणाले यात सर्वेक्षणाचे काम मंदगतीने होत असलेल्या तालुक्यातील संबंधित
अधिकारी / कर्मचारी यांनी बेल कंपनीच्या इंजिनिअर्सशी कामाबाबत पाठ पुरावा करणे
आवश्यक आहे. सदरचे काम हे अत्यंत महत्वपूर्ण असून ते आठ दिवसात पूर्ण करण्याची
सूचना त्यांनी केली.
प्रारंभी सहाय्यक प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांनी
तालुकानिहाय जात सर्वेक्षणाच्या कामाची माहिती बैठकीत दिली. यात भुसावळ, अंमळनेर,
चोपडा व बोदवड पंचायत समित्यांचे जात सर्वेक्षणाचे काम 100 टक्के पूर्ण झालेले
आहे. तर चाळीसगांव 98 टक्के, एरंडोल 90 टक्के, रावेर 83 टक्के, पारोळा 81 टक्के,
पाचोरा 73 टक्के तर धरणगांव 71 टक्के काम पूर्ण झालेले परंतू जळगांव ( 43 टक्के),
मुक्ताईनगर (53 टक्के), भडगांव ( 57 टक्के), जामनेर (58 टक्के) व यावल (62
टक्के) या पाच पंचायत समित्यांचे जात
सर्वेक्षणाचे काम मंदगतीने सुरु असल्याबद्दल जिल्हाधिकारी राजूरकर यांनी नाराजी
व्यक्त केली.
नगरपालिका क्षेत्रात फैजपूर, सावदा, चाळीसगांव, चोपडा,
अंमळनेर, धरणगांव व रावेर या नगरपालिकांमध्ये सर्वेक्षणाचे काम 100 टक्के झालेले आहे. तर जामनेर (93 टक्के), यावल ( 86
टक्के), पाचोरा (89 टक्के) काम झाले असल्याची माहिती श्री. भोकरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment