Tuesday, 2 April 2013

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संस्थेची सभा संपन्न

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली
जिल्हा परिविक्षा आणि  अनुरक्षण संस्थेची सभा संपन्न

         जळगांव, दि. 2 :- जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेच्या कार्यकारी मंडळाची तिमाही सभा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली निरीक्षण गृहात आज सायंकाळी संपन्न झाली.
           यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी व्ही. ए. पाटील, महिला व बालविकास अधिकारी देवेद्र राऊत, निरीक्षण गृहाचे मानद सचिव दत्तात्रय  नथ्यू चौधरी, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष  प्र. प्र. इंगळे. निरीक्षण गृहाचे अधिक्षक अशोक मारवाडी आदिसह कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
           यावेळी निरीक्षण गृहासंबधी विविध विषयांवर चर्चा झाली. यात निरीक्षण गृहात गोबर गॅस प्लॅट बसविणे, इलेक्ट्रीकची सर्व कामे पूर्ण करुन भारनियमन कालावधीत वीज खंडित होऊ नये म्हणून बॅटरी बँकपणे देणे आदि कामांना मंजूरी देण्यात आली तसेच दिनांक 6 एप्रिल 2013 रोजी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर  व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती उगले हे निरीक्षण गृहातील मुलांसोबत स्नेह भोजन घेऊन येथील मुलांना देण्यात येणा-या अन्नाची क्वॉलिटी ही पाहणार आहेत.
                                    * * * * * * *

No comments:

Post a Comment