जळगांव, दि. 16 :- महाराष्ट्र
शासनाच्या आदेशान्वये जळगांव जिल्हयासाठी केरोसीनचा तिमाही कोटा 5 हजार 544 किलोलिटर प्राप्त झाला असल्याची माहिती
जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी दिली आहे.
प्रतिमहा 1848 किलो लिटर प्रमाणे माहे
एप्रिल, मे व जून 2013 चा केरोसीन कोटा एकूण 5 हजार 544 किलोलीटर प्राप्त झाला
असून तालुका स्तरावर तहसिलदार यांनी सदरचे केरोसीन नियतन महिन्याच्या 25
तारखेपर्यंत उचल करुन वाटप करणे आवश्यक आहे. तालुकानिहाय केरोसीनचा तिमाही एकूण
कोटा पुढीलप्रमाणे – जळगांव 414, जामनेर – 522, एरंडोल – 288, धरणगांव – 360,
भुसावळ – 414, बोदवड – 234, यावल – 432, रावेर – 378, मुक्ताईनगर – 234, पाचोरा –
378, चाळीसगांव – 486, भडगांव – 288, अंमळनेर – 342, चोपडा – 486, पारोळा – 288 , एकूण - 5544
No comments:
Post a Comment