जळगांव, दि. 15 :- भारतीय सैन्य दलात
युवकांना अधिकारी पदाची संधी उपलब्ध व्हाव्यात
यासाठी, केंद्रीय लोकसेवा अयोगाच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा माहे
सप्टेंबर व माहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये सीडीएस च्या परिक्षा घेतल्या जातात,
त्यासाठी माहे सप्टेंबर 2013 मध्ये होणा-या सीडीएस परिक्षेचे ऑनलाईन अर्ज दिनांक
25 मे 2013 रोजी उपलब्ध होणार आहे. यासाठी सीडीएस या परिक्षेला बसणारा उमेदवार हा
पदवीच्या परिक्षेला शेवटच्या वर्षात शिकत असावा अथवा पदवीची शेवटची परिक्षा दिलेली
असावी, कंबाईन डिफेन्स सर्व्हीसेस या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पुरुषांप्रमाणे
महिला उमेदवारांना सुध्दा आर्मीत अधिकारी पदाच्या संधी उपलब्ध असल्याने या सुवर्ण
संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण कंद्र नाशिक
रोड, नाशिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी केंद्राच्या दुरध्वनी क्र 0253 /
2451031 व 2451032 वर संपर्क करावा.
No comments:
Post a Comment