जळगांव, दि. 16 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
जळगांव यांच्यामार्फत कामगार न्यायालय,
जळगांव येथील प्रलंबित असलेले
खटले तडजोडीने व लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी रविवार दि. 21 एप्रिल 2013 रोजी सकाळी 10.30 वाजता कामगार न्यायालय
परिसर, जुने बी. जे. मार्केट, 3 रा मजला, जी गाळा जळगांव येथे लोकअदालत घेण्यात येणार आहे. तरी कामगार
न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस ज्यांना लोकअदालतमध्ये ठेवावयाच्या असतील त्या
सर्व संबंधितांनी स्वत: वकीलांमार्फत, प्रतिनिधीमार्फत लोकअदालतमध्ये प्रकरण
ठेवण्याबाबतचे संमतीपत्रक भरुन दयावे असे न्यायालय अधिक्षक , श्री अशोक पानपाटील
यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment