जळगाव, दिनांक 05 (जिमाका वृत्त ) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून दिनांक ६ जून २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी संस्थांमध्ये मान्यवर वक्ते व विषय तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
कार्यक्रमात खालील विषयांवर मान्यवर वक्ते व्याख्याने देणार आहेत:
१. नागरी कर्तव्ये आणि शिष्टाचार
२. कुटुंब प्रबोधन
३. स्वदेशी विचारांचा प्रसार
४. सामाजिक समरसता
५. पर्यावरण संरक्षण
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी संस्थांनी या कार्यक्रमाचे नियोजन करावे व जनसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment