Tuesday, 10 June 2025

मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहात 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, दिनांक 10 (जिमाका वृत्त ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता इयत्ता 8 वी ते महाविद्यालयीन तसेच तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


वसतिगृह प्रवेशासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग तसेच अपंग, अनाथ अशा सर्व प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरावा आणि त्याची प्रत वसतिगृह कार्यालयात जमा करावी, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य आणि अन्य आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.

No comments:

Post a Comment