Tuesday, 10 June 2025

चाळीसगांव नगरपरिषदेनी वृक्षछाटणी बाबत मागविल्या हरकती, सूचना

जळगाव, दि. 10 (जिमाका) : चाळीसगांव नगरपरिषदेच्या वतीने एक जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. विभाग नियंत्रक, रा.प. जळगांव (रा.प. महामंडळ) यांच्या चाळीसगांव आगार येथील विदयुत बस प्रणाल्याकरिता उच्चदाब ओव्हरहेड विदयुत पुरवठा लाईन महापारेषण १३२ केव्ही सबस्टेशन, हिरापुर रोड, चाळीसगांव येथून बसस्थानकापर्यंत उभारण्याचे काम सुरु आहे. या लाईनच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्ष छाटणीसाठी नगर परिषद, चाळीसगांव यांच्याकडे परवानगी मिळविण्यासाठी अर्ज प्राप्त झालेला आहे.

यासंदर्भात नगर परिषदेने परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या हरकती अथवा सूचना असल्यास, नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात सादर कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचनांचा विचार केला जाणार नसल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment