जळगाव, दि. १३ जून (जिमाका वृत्तसेवा) –राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक’ (सूक्ष्म सिंचन) अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना सन २०२५-२६ या वर्षात लाभ देण्यासाठी विशेष अर्ज नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम १५ जून २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत अत्यल्प भूधारकांना ५५ टक्के तर बहुभूधारकांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. यासोबतच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत २५ ते ३० टक्के अतिरिक्त पुरक अनुदानाची तरतूदही आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत मिळून एकूण ९० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.
या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदविता येणार असून अर्ज करताना ७/१२ व ८अ उतारे, आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी, सिंचन सुविधेची नोंद किंवा स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. योजनेचा लाभ अधिकतम ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येतो. अर्जांची संगणकीय सोडत होणार असून निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.
संच बसवल्यानंतर तपासणी करून शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाईल. जिल्ह्यातील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी आणि मंडळ कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात मेळावे घेऊन माहिती दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा CSC केंद्रावर संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत
No comments:
Post a Comment