जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) :
शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र निवासी केंद्र , जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश नोंदणी १५ जुलै २०२५ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात करावी, असे आवाहन केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.
या केंद्रात शासनामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरूण, पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, तसेच शालेय व कलाशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. उमेदवार अंध, कर्णबधिर किंवा अस्थिव्यंग पैकी एका प्रकारच्या अपंगत्वाचा असावा. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. उमेदवार संसर्गजन्य आजारमुक्त असावा
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांचे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र (मूकबधिरांसाठी श्रवणालेख आवश्यक), जन्म दाखला, आधार कार्ड, UDIID कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांगत्व स्पष्ट दिसणारे उमेदवाराचे ५ फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स यांचा सामावेश आहे. योग्य पात्रता असलेल्या इच्छुकांनी वरील सर्व कागदपत्रांसह लिहून दिलेला अर्ज कार्यालयात सादर करावा, असे आवाहन केंद्राच्या अधीक्षकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment