Wednesday, 8 January 2014

भव्य कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा : आमदार राजीवदादा देशमुख

भव्य कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा !
:आमदार राजीवदादा देशमुख
  
चाळीसगाव दिनांक 8 :- लोकनेते कै.अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य कृषि प्रदर्शनाचे तालुक्यात दिनांक 09 ते 12 जानेवारी,2014 दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 09 जानेवारी, 2014 रोजी सकाळी 11:00 वाजता कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सहकार व पणन राज्यमंत्री ना.सुरेश धस यांच्या हस्ते होणार असून राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे हे अध्यक्षस्थानी  राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ना.रामराव वडकुते अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ, मा.अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष, श्री.मच्छिद्र पाटील, उपाध्यक्ष जि.प.जळगांव यांच्यासह जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, व्यवस्थापकीय संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ  श्री.डि.जी.चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
            या कृषि प्रदर्शनात नामांकीत कृषि कंपनीची बियाणे, खते, ओषधी इ.वस्तुंचे प्रदर्शन स्टॉल मांडण्यात येणार असून मजूरांच्या समस्येला पर्याय ठरत असणा-या आधुनिक तंत्र मशिनरीचे दालन भरणार आहे. आधुनिक ठिबक सिंचन तंत्रज्ञान, पशू व दुग्ध व्यवसाय संदर्भ, गृहउपयोगी व बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन, कृषि विषयक पुस्तके व सी.डी.चे प्रदर्शन, पशु प्रदर्शन व पशु मेळावा, प्रगतीशील शेतक-यांचा सन्मान सोहळा, आदर्शगाव संकल्पना अशी प्रमुख वैशिष्टे या भव्य कृषि प्रदर्शनाची असणार आहे.
            दिनांक 09 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान गहू उत्पादन, फळ प्रक्रीया, कांदा लागवड, गट शेती, मृद व जल संधारण, लिंबू/मोसंबी लागवड, ठिबक सिंचन, कापुस लागवड, पशुपालन व व्यवस्थापन या विषयीचे चर्चासत्राचेही आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
            तरी तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी या भव्य अशा कृषि प्रदर्शनाचा लाभ घेऊन आधुनिक शेतीची कास धरावी असे आवाहन तालुक्याचे आमदार राजीवदादा देशमुख यांनी केले आहे.
ना.सुरेश धस यांच्या हस्ते शासकीय गोदामाचे भुमिपूजन
            दिनांक 09 जानेवारी, 2014 रोजी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व नाबार्ड यांचे निधीतून चाळीसगांव येथे गट नं.412 करगांव रोड, गणपती मंदीराच्यामागे (डेराबर्डी) चाळीसगांव येथे शासकीय धान्य गोदाम उभारणी प्रस्तावित असून सदर जागेचे भूमिपुजन समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर गोदामाचे भुमिपूजन राज्याचे महसुल मदत व पुर्नवसन कार्य राज्यमंत्री ना.सुरेश धस यांच्या हस्ते सकाळी 10:00 वाजता आयोजित केले असून सदर कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

                                         * * * * * * * * 

No comments:

Post a Comment