लोकराज्यचा ‘आत्ता
या क्षणी’ ई-गव्हर्नन्स विशेषांक
प्रकाशित
मुंबई, दि.21 : प्रशासन व्यवस्थेला
माहिती तंत्रज्ञानाची साथ लाभल्याने मागील काही वर्षात महाराष्ट्राचे प्रशासन अधिक
गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक झाले आहे. माहिती तंत्रज्ञान हा
आधुनिक काळातील सुप्रशासनाचा प्रमुख आधार बनला आहे. हाच धागा पकडून लोकराज्यचा
जानेवारी महिन्याचा अंक ‘आत्ता या क्षणी’ ई-गव्हर्नन्स विशेषांक म्हणून प्रकाशित
करण्यात आला आहे.
स्वतंत्र
माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र
हे देशातील पहिले राज्य ठरले. या माध्यमातून राज्यात अनेक अभिनव प्रयोग यशस्वीपणे
राबविले गेले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात आमुलाग्र परिवर्तन घडून आले आहे. या
सर्व बदलाचा वेध या विशेषांकामधून घेण्यात आला आहे.
ई-गव्हर्नन्सच्या
क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध पुरस्काराने गौरविण्यात
आले. 33 व्या स्कॉच शिखर परिषदेत ई-गव्हर्नन्स विषयक 18 पारितोषिके मिळवून
महाराष्ट्राने विक्रम केला. ई-गव्हर्नन्स अंतर्गत पेपरलेस शासकी व्यवहाराला
प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक विभाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काम करीत आहेत.
राज्यात 35 हजार नागरी सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. निविदा प्रक्रिया
पारदर्शक होण्यासाठी ई-टेंडरिंगचा वापर केला जात आहे. राज्यातील 25 हजार
ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून 'सेतू' , 'संग्राम' या कार्यप्रणाली यशस्वी ठरल्या
आहेत. महसूल, विक्रीकर, राज्य उत्पादन शुल्क, उच्च शिक्षण, कृषी, आरोग्य,
नगरविकास, साखर आयुक्तालय या विभागात
माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.
माहिती
तंत्रज्ञानावर आधारित सेवा-सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने केलेल्या
प्रगतीचा आलेख सोप्या भाषेत या अंकात मांडण्यात आला आहे. सोबत या क्षेत्रातील
अभिनव प्रयोग आणि यशकथा देखील देण्यात आल्या आहेत. लोकराज्यच्या इतर अंकांप्रमाणे
हा अंकदेखील संग्राह्य असाच आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment