मतदार याद्यांची अंतीम प्रसिध्दी 14 जानेवारी
रोजी
जळगाव,
दि. 1 :- मुख्य निवडणूक अधिकारी,
नवी दिल्ली यांचेकडील दिनांक 31 डिसेंबर 2013 अन्वये दिनांक 1/1/2014 या अर्हता
दिनांकावर आधारीत मतदार याद्यांची अंतीम प्रसिध्दी यापूर्वी 6/1/2014 या दिवशी
होणार होती त्यात बदल करण्यात आलेला असून आता अंतीम प्रसिध्दी 14/1/2014 या दिवशी
करण्यात येईल. तरी या बदलाची नोंद सर्वांनी घ्यावी व सहकार्य करावे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
* * * * * * *
समाजकल्याण विभागातील
प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी
5 जानेवारी रोजी ऑनलाईन
परीक्षा
जळगाव, दि. 1 :-
समाजकल्याण आयुक्तालय, पुणे व त्यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील
प्रयोगशाळा सहाय्यक पदाची ऑनलाईन परीक्षा रविवार दिनांक 5 जानेवारी 2014 रोजी
घेण्यात येणार आहेत.
अमरावती, अकोला व यवतमाळ हे जिल्हे
वगळता राज्यातील सर्व जिल्हयामध्ये एम. के. सी. एल. मार्फत या परीक्षा आयोजित
करण्यात आलेल्या आहेत. अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्यातील परीक्षा पुणे येथे
घेण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ( एम. के. सी. एल.
) पुणे या शासनमान्य संस्थेव्दारे वरील पदासाठी अर्ज केलेले आहेत. त्या सर्व
उमेदवारांना त्यांच्या अर्जात नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एम. के. सी. एल.
तर्फे यापुर्वीच एस. एम. एस. पाठविण्यात आलेले आहेत. सर्व उमेदवारांनी परीक्षेसाठी
आवश्यक असलेली आपली प्रवेशपत्रे ( हॉल तिकिट) दिनांक 4 जानेवारी 2014 पर्यंत
कार्यालयीन वेळेपूर्वी समक्ष घेवून जावेत.
आपला विहीत नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र ज्ञान मंडळ ( एम. के. सी. एल.) यांच्या
ज्या ए. टी. सी. केंद्रावर जमा केलेला आहे. त्याच केद्रावरुन प्रवेशपत्रे ( हॉल
तिकीट ) उमेदवारांनी घेऊन जावेत.
https://oasis.mkcl.org/dsw2012 या संकेतस्थळावरुन हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल. असे आवाहन आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment