लोकशाही दिनी 85 अर्ज प्राप्त
जळगाव, दि.6- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन दि. 6 जानेवारी रोजी घेण्यात आला. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही
दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पुढील विभागाच्या तक्रारी प्राप्त झाल्या
आहेत. महसूल विभाग - 23, जि. प. - 14, म. रा. वि. म. - 02, नगर
पालिका- 09, कृषी -01 वन विभाग 01, सा.
बा. -01, पाटबंधारे -02, सहकार - 24 आणि इतर - 08 सदरच्या तक्रारी संबंधित विभागाकडे
पाठविण्यात आल्या. आहेत. यावेळी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
* * * * * * * *
तांत्रिक अधिकारी पदाकरिता 25 रोजी लेखी
परीक्षा
जळगाव, दि. 6 :- महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य निधी असोसिएशन (महाराष्ट्र) नागपूर
मार्फत तांत्रिक अधिकारी या कंत्राटी पदाकरीता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर
तांत्रिक अधिकारी पदाची एकूण रिक्त पदे 257 असून सदर पदापैकी जळगाव जिल्हयातील 27
पदे भरण्यात येणार आहेत. सदरची जाहिरात व आवेदन अर्जाचा नमुना
www.mahaegs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तांत्रिक पदाचे
आवेदन अर्ज दि. 17 जानेवारी 2014 पावेतो उपजिल्हाधिकारी (रोहयो) जळगाव यांचे
कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. लेखी परिक्षेचे आयोजन दि. 25 जानेवारी 2014
रोजी जिल्हा मुख्यालयी करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक उमेदवारांनी याचा लाभ
घ्यावा व जास्तीत जास्त प्रमाणात आवेदन अर्ज सादर करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी
(रोहयो) यांनी केले आहे.
* * * * * * * *
माजी सैनिकांना व वीर पत्नी यांना रोजगाराची
सुवर्ण संधी
जळगाव, दि. 6 :- जळगाव जिल्हयातील माजी
सैनिकांना व तसेच वीर पत्नी यांना तोफखाना रेजिमेंट नाशिक येथे दिनांक 12 जानेवारी
2014 रोजी नौकरी संदर्भात मेळावा आयोजित करण्यात येत आहे. सदर मेळाव्यामध्ये
कारखानदार, बिझनेस मॅन आणि एम आय डी सी चे अधिकारी भाग घेवून पात्र उमेदवाराना
रोजगार उपलब्ध करुन देणार आहेत. तरी जळगाव जिल्हयातील जास्तीत जास्त इच्छूक माजी
सैनिकांनी आणि वीर पत्नी यांनी मेळाव्यासाठी हजर रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक
कल्याण अधिकारी कॅप्टन मोहन कुळकर्णी
यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment