प्रजासत्ताक
दिनाचा 64 वा वर्धापन
दिन समारंभ पोलीस परेड मैदानावर
: तहसिलदार बाबासाहेब गाढवे
चाळीसगाव, दिनांक 22 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापन
दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2014 रोजी सकाळी 09:15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य
शासकीय समारंभ उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान
चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास तालुक्यातील अधिकाधिक लोकांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. शहरातील
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तहसिल कार्यालय चाळीसगाव येथे उप
विभागीय अधिकारी चाळीसगांव यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व कार्यालय व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली प्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस उप विभागीय अधिकारी मनोज
घोडे पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी मालती
जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह
तालुक्यातील विविध कार्यालयाचे प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी ध्वज सरंक्षणासाठी पोलीस प्रमुखांना दोन पोलीस
कर्मचा-यांची नियुक्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या, तर वन्य जिवांचे सरंक्षण व
वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीपर भित्तीपत्रीका प्रदर्शीत करण्याच्या सुचना वन
विभागाला देण्यात आल्या, विविध शाळांनी आपले सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजनाची
मंजूरी घेऊन त्याचे नियोजन करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना सुचना
देण्यात आल्या तर आदर्श आचारसंहितेचे यथोचित नियोजन सर्व विभागप्रमुखांनी
करण्याच्या सुचना प्रातांधिकारी घोडे यांनी या बैठकीत दिल्या.
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या
शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी 26 जानेवारी, 2014 रोजी सकाळी 08:30 ते
10:00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय
समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा
ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 08:30 पूर्वी किंवा
10:00 वाजेनंतर करावे असे आवाहनही उप विभागीय अधिकारी मनोज घोडे यांनी केले आहे.
नगरपरिषदेमार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज घाट येथे होणार ध्वजारोहण
चाळीसगाव नगरपरिषदेमार्फत 26
जानेवारी, 2014 रोजीच्या 64 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण नगराध्यक्षा अनिता
चौधरी यांच्या हस्ते सकाळी 08:20 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज घाट येथे होणार
असून या समारंभासाठी शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
उपाध्यक्ष प्रदीप निकम तसेच मुख्याधिकारी रविंद्र जाधव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment