राष्ट्रीय
महामार्ग क्रं.211 च्या भुसंपादनाच्या कामास गती
: प्रांताधिकारी मनोज घोडे
चाळीसगाव, दिनांक 31 :- औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रं.211 च्या चौपदरीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यातील 14
गावातील शेतजमिनी संपादीत करण्याचे कामकाज सुरु होते. भारत सरकारच्या डिसेंबर-2013
च्या राजपत्रान्वये सदर राष्ट्रीय महामार्गाचे भुसंपादनाचे कामकाज पाचोरा
प्रांताधिका-यांकडून चाळीसगांव प्रांताधिका-यांकडे वर्ग झाले आहे. भुसंपादनाबाबत
आज प्रथमच प्रांत कार्यालय, चाळीसगांव येथे शेतक-यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात
आले व सदर बैठकीत चाळीसगांव व कोदगांव येथील शेतक-यांना त्यांचे यापुर्वीचे
बाह्यवळण रस्त्याचे भुसंपादनाचे वाढीव मोबदला प्रलंबीत असल्याने तो त्वरीत मिळण्याची
मागणी केली. त्या अनुषंगाने सदरचा मोबदला मिळण्यासाठी शेतक-यांचे प्रतिनीधी म्हणून
पाच शेतकरी व त्यांचे विधीतज्ञ म्हणून वकील व संबंधित अभियंता यांची समिती स्थापन
करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती तालुक्याचे आमदार राजीव देशमुख यांच्या
मार्गदर्शनाखाली शासन व शेतकरी यांच्यातील समन्वय घडवून शेतक-यांना वेळेवर मोबदला
मिळवून देण्यास प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भुसंपादनाच्या मोजणी कामकाजातील अडथळा
दुर झाला असुन भुसंपादन कामकाजाच्या या पहिल्याच बैठकीत यश मिळाल्याचे
प्रांताधिकारी मनोज घोडे यांनी सांगितले.
या बैठकीस तहसिलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस
निरीक्षक संजय देशमुख, प्रकल्प अधिकारी राष्ट्रीय महामार्ग संदीप खलाटे, उप
अधिक्षक भुमि अभिलेख राजू यशोद, शाखा अभियंता पी.एस.पाटील यांच्यासह विविध
कार्यालयातील अधिकारी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. समितीमध्ये अनुक्रमे
अंबु बुधा पाटील कोदगांव, चंद्रकांत गळपतराव शिंदे पाटखडकी, बापु भास्कर पाटील
चाळीसगांव, हिम्मतराव रामराव पाटील कोदगांव, कुणाल भरत बुंदिलखंडे चाळीसगांव यांचा
समावेश करण्यात आला तर विधीतज्ञ म्हणून ॲड.सतिष तुकाराम पवार व ॲड.किर्ती सतिष
पवार व शासकीय अधिकारी म्हणून शाखा अभियंता पी.एस.पाटील, उप अभियंता ए.यु.भुरट
यांचा समावेश करण्यात आला आहे.
भुसंपादन होणारी सर्व 14 गावे अनुक्रमे बोढरे, रांजणगांव, चाळीसगांव,
कोदगांव, पाटखडकी, खडकी बु., बिलाखेड, करगांव, भोरस खु., भोरस बु., दसेगांव बु.,
मेहुणबारे, खडकीसिम व दहिवद ही चाळीसगांव तालुक्यात येत असल्याने व कामास अधिक गती
यावी म्हणुन भुसंपादनाचे कामकाज हे पाचोरा प्रांताधिका-यांकडून चाळीसगांव प्रांताधिका-यांकडे
उपरोक्त राजपत्रान्वये वर्ग करण्यात आले आहे. तथापी वरील 14 गावांपैकी 11 गावांची
मोजणीचे कामकाज पुर्ण झाले असून मेहुणबारे येथील मोजणी कामकाज सुरु आहे. तसेच
चाळीसगांव व कोदगांव येथील मोजणी कामकाज लवकरच सुरु होऊन राष्ट्रीय महामार्ग
क्रं.211 च्या भुसंपादनाच्या कामकाजात प्रांताधिकारी मनोज घोडे यांना पहिल्याच
बैठकीत यथ मिळाल्याने त्यांचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment