राष्ट्रीय
युवा दिनाचे औचित्य साधत
आ.राजीव
देशमुख यांच्या हस्ते क्रिडा संकुलाचे भुमिपूजन
चाळीसगाव, जि. जळगाव, दिनांक 12 :- तालुक्यापासून देशपातळी
पर्यंत मजल मारणारे क्रिडा पटू या तालुक्याने दिले असून क्रिडा प्रेमींना सरावासाठी
उपयुक्त असे तालुका क्रिडा संकुल उभे रहावे अशी अनेक वर्षाची मागणी होती. आणि आज
राष्ट्रीय दिनी चाळीसगांव तालुक्यातील खडकी शिवारात भव्य अशा क्रिडा संकुलाचे
भुमिपूजन आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी राजमाता जिजाऊ व
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात
करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा
अनिता चौधरी, पंचायत समिती सभापती विजय जाधव, खडकीच्या सरपंच अलकानंद भंवर,
तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गट विकास अधिकारी मालती जाधव, जिल्हा क्रिडा अधिकारी
सुनंदा पाटील, सार्वजानिक बांधकामचे जे.बी.मालविय यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित
होते.
आपल्या भाषणात
आमदार देशमुख यांनी सांगितले की, तालुक्यातील क्रिडा प्रेमींची क्रिडा संकुलाची
इच्छा पूर्ण होतांना मनस्वी आनंद होत आहे. या क्रिडा संकुलासाठीचा खर्च एकूण 1
कोटी 20 लाख मंजूर झाला असून या क्रिडा संकुलाच्या मंजूरीसाठी जिल्हाधिकारी व
प्रशासनाचे सहकार्य देखील मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. या क्रिडा
संकुलाचे एकूण क्षेत्रफळ 2 हेक्टर 30 आर असून
क्रिडा संकुलामध्ये धावनपथ बांधणे, खो-खो मैदाने, कबड्डी मैदाने, व्हॉलीबॉल
मैदाने अशा प्रकारची विविध मैदानांचा समावेश आहे, याचा तालुक्यातील सर्व क्रिडा
प्रेमींना नक्कीच लाभ होईल. त्याच बरोबर या क्रिडा संकुलाच्या जागेसाठी खडकीच्या
सरपंच अलकानंद भंवर यांनी ग्रामसभेत मंजूरीअंती जागा दिल्याबद्दल त्यांचे आभार
मानले.
मार्गदर्शनपर
भाषणात खडकीच्या सरपंच अलकानंद भंवर यांनी आमदार राजीव देशमुख यांच्या
प्रयत्नामुळेच तालुक्यात क्रिडा संकुल उभे राहत असल्याने त्यांचे आभार मानले.
त्याच बरोबर खडकी ग्रामपंचायती लगत असलेल्या एम.आय.डी.सी. ला चालना देऊन जे उद्योग
उभारण्यास गती मिळाली त्यामुळे मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने
आ.देशमुखांच्या विकास कामांबद्दल शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमास
महानंदा चे संचालक प्रमोद पाटील, उपनगराध्यक्ष प्रदीप निकम, अजित देशमुख, बाजीराव
दौंड, दिलीप चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत देशमुख, शिक्षण सभापती नगर परिषद
रामचंद्र जाधव, निखील राठोड, दिपक पाटील, किशोर पाटील यांच्यासह मान्यवर व नागरिक
मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित देशमुख यांनी केले
तर आभार रामचंद्र जाधव यांनी मानले.
आदर्श
शेतक-यांच्या सन्मानाने कृषि प्रदर्शनाची सांगता
चाळीसगाव, जि.
जळगाव, दिनांक 12 :- लोकनेत कै.अनिलदादा
देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत तालुक्यात दिनांक 09.01.2014 ते
12.01.2014 या कालावधीत भरविण्यात आलेल्या कृषि प्रदर्शनाची आज आदर्श शेतक-यांचा
सन्मान करुन सांगता करण्यात आली. या समारोपाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी
पालकमंत्री सतिष पाटील उपस्थित होते तर
प्रमुख पाहूणे म्हणून माजी खा.वसंतराव मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे
होते.
अध्यक्षीय
भाषणात माजी पालकमंत्री म्हणाले की, स्मृती दिन, वाढ दिवस हे सर्वत्र साजरे
होतांना दिसतात परंतु वडिलांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या स्मृतीदिनी
शेतक-यांची तंत्रज्ञानाशी जोड घालून हरितक्रांती घडविण्यासाठीचे भव्य असे कृषि
प्रदर्शन भरवून ख-या अर्थाने स्मृती दिन साजरा करण्याचा आमदार देशमुख यांचा हा
उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले. शेतक-यांची बांधिलकी जपणारा
लोकनेता अनिलदादा देशमुख याच्या विचारांनी प्रेरीत होऊन आमदार राजीव देशमुख यांना
विकास कामे करण्याची संधी या जनतेने उपलब्ध करुन दिली आणि त्यांचा सन्मान करुन आज
ख-या अर्थाने आमदार देशमुख यांनी वारसारूपी मिळालेली संस्कृतीचे दर्शन या
प्रदर्शनातून घडविले आहे.
तालुक्याच्या
प्रश्नांना ख-या अर्थाने न्याय देणारे नेतृत्व या तालुक्याला लाभले असून चाळीसगाव
तालुका हा बेलगंगा साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय व राष्ट्रीय मिल या उद्योगामुळे
प्रसिध्द् होता. मात्र या तालुक्याने गमावलेले हे वैभव परत मिळविण्यासाठी सर्व
पक्षांनी व जनतेने आमदार देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास आमदार
देशमुख हे या तालुक्याचे गमावलेले वैभव परत मिळविण्यास नक्कीच यशस्वी होतील अशी
ग्वाही माजी खासदार वसंतराव मोरे यांनी आपल्या भाषणातून दिली.
या कार्यक्रमात
जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प.समाज कल्याण सभापती राजेंद्र राठोड,
कांताताई मराठे, प्रदीप देशमुख, रोहिदास पाटील, जालम पाटील, प्रदीप निकम,
महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, आदि मानयवर उपस्थित होते.
तालुक्यातील जवळपास 1 लाख शेतक-यांनी या भव्य अशा कृषि
प्रदर्शनाचा लाभ घेतला असून शेतक-यांचाही त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाल्यामुळे या
प्रदर्शनाचा उद्देश ख-या अर्थाने सफल झाल्याचा आनंद व्यक्त करीत आमदार देशमुख
यांनी सर्वांचे आभार मानले.
* * * * * *
* *
No comments:
Post a Comment