अशासकीय सदस्यांच्या नेमणूकी करीता
15 जानेवारी पूर्वी प्रस्ताव सादर करावेत
जळगाव, दि. 2 :- बाल न्याय (मुलांची काळजी व
संरक्षण) अधिनियम 2000 प्रकरण तीन मधील कलम 29 (1) नुसार व बाल न्याय (मुलांची
काळजी व संरक्षण) नियम 2002 कलम 13 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार जळगाव
जिल्हयाकरीता बाल कल्याण समितीची पुनर्रचना करावयाची आहे. सदर समितीवर 5 अशासकीय
सदस्यांची शासनामार्फत नेमणूक करण्याकरीता नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
समितीचे अध्यक्ष व सदस्य यांना बाल
मानसशास्त्र व बाल कल्याणाचे विशेष ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना मानस शास्त्र,
गुन्हेगारी शास्त्र, समाजशास्त्र, समाजकार्य, अर्थशास्त्र, गृहविज्ञान शास्त्र,
शिक्षण शास्त्र , राज्यशास्त्र, महिला विषयक अभ्यास, ग्रामविकास इत्यादीपैकी समाज
विज्ञानांच्या कोणत्याही एका विषयातील किंवा विधी वा औषध शास्त्र यातील पदवीधारण
केलेली असावी. समितीचे सदस्य यांना बालकांशी संबंधीत असणा-या कायदा, आरोग्य,
शिक्षण किंवा मुलांशी संबंधीत इतर पुनर्वसन व विकास कार्याच्या क्षेत्रातील निदान
3 वर्षाचा अनुभव असावा. समीती नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांवार कोणताही फौजदारी
गुनहा नसावा. समिती सदस्यांचा दत्तक विषयक सेवांचा पदयोजनात कोणताही थेट संपर्क
नसावा. पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र, समितीच्या सदस्यांचे वय नियुक्ती
वेळी 35 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा अधिक नसावे, नोकरी करीत असल्यास संबंधीत
कार्यालय प्रमुखाचे नाहरकत प्रमाणपत्र , अर्जदार व्यक्तीचे संमतीपत्र
त्यासाठी निकष पूर्ण करणा-या सामाजिक
कार्यकर्त्यांना दि. 15 जानेवारी 2014 पूर्वी नामांकन सादर करावे. अधिक माहितीसाठी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दूरध्वनी क्र. 0257- 2228828 येथे संपर्क साधावा असे
आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
* *
* * * * * *
No comments:
Post a Comment