राष्ट्रीय कृषी मेळाव्यास भेट देण्याचे आवाहन
जळगाव, दि. 7 :- नागपुर येथे केंद्रीय कापुस
संशोधन संस्थेच्या परिसरात दिनांक 9 ते 13 फेब्रुवारी 2014 या कालावधीत प्रथमच
कृषी वसंत 2014 या कृषि मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करयात आलेले आहे. या
प्रदर्शनात पीक प्रात्याक्षिकांचे प्लॉट, शेतक-यांच्या यशोगाथा, शेतकरी शास्त्रज्ञ
परिसंवाद, कृषि व कृषि संलग्न विषयांच्या विविध कार्यशाळा, परिषदा, स्थानिक
भाषेतील परिसंवादाच्या आयोजनाबरोबरच उच्च दर्जाचे पशुधन तसेच दुग्धव्यवसाय,
मत्स्यव्यवसाय, कुक्कूटपालन, पणन, खादी व ग्रामद्योग, कृषि व फलोत्पादन, औषधी
वनस्पती रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती,
कृषि यांत्रिकीकरण, जैव तंत्रज्ञान, कृषि निविष्टा सुक्ष्म सिंचन, जलव्यवस्थापन,ख्
कृषि माल साठवणुक गोदामे कृषी प्रक्रिया व मुल्यावर्धन इतयादी दालनाचा समावेश
असणार आहे. सदर प्रदर्शनासाठी शेतक-यांनी परतीच्या प्रवासासह व्दितीय श्रेणी
स्लीपर वर्गाचे तिकिट आरक्षण केल्यास 50 टक्के सुट देण्यचाचे रेल्वे मंत्रालयाने
मान्य केले आहे. त्यासाठी तालुका कृषि अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी
संपर्क करावा व सवलतीचा लाभ घ्यावा असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
* * * * * * * *
जळगाव जिल्हयात मनाई आदेश जारी
जळगाव, दि. 7 :- जळगाव जिल्हयात गावोगावी यात्रा, उत्सव सुरु असून दि. 14
जानेवारी 2014 रोजी हिंदु बांधवांचा मकरसंक्रांत व मुस्लीम बांधवांचा ईद ए मिलाद
हा सण एकत्रीत साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात शांतता व
सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी जळगाव जिल्हयात
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) आन्वये मनाई आदेश जारी
केले आहेत. सदरचे आदेश 21 जानेवारी 2014 पर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन
करणा-यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी धनंजय निकम यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
समाज भुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव
मागविले
जळगाव, दि. 7 - शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सन 2014-15 या
वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज
भुषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी जळगाव जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक
संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. व्यक्तीगत पुरस्कारासाठी पुरुषाचे वय 50
वर्षे व महिला करीता वय 40 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक
सेवेचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त असावा.
ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रस्ताव सादर करावयाचे असतील अशा व्यक्ती व
संस्थांनी विहित नमुना फॉर्मसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीरासमोर, महाबळ रोड, जळगाव यांचेकडे
संपर्क साधावा. प्रस्ताव सादर करावयाचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2014 असून
त्यानंतर प्राप्त होणा-या प्रस्तावाचा विचार
केला जाणार नाही. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त
समाजकल्याण पी. सी. चव्हाण यांनी केले आहे.
* * * * * * * *
ना. एकनाथराव खडसे यांचा
जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव, दि. 7 :- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे
यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 8 जानेवारी
2014 रोजी पहाटे 5. 35 वा. राजेंद्रनगर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
निवासस्थानाकडे प्रयाण,
किंवा
सकाळी 6.50 वा.
महानगरी एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक
येथे आगमन व शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण, रात्री मुक्काम जळगाव.
* * * * * * * *
डॉ. मदन कोथुळे राज्य
समन्वयक, राष्ट्रीय अनुसूचित
जाती आयोग यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दि. 7 :- भारत सरकाच्या राष्ट्रीय
अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक डॉ. मदन
कोथुळे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2014 रोजी दुपारी 4.00 वा. जालना येथुन जळगावकडे
प्रयाण, संध्या 7.00 वा. जळगाव येथे आगमन व राखीव व मुक्काम
शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2014 रोजी सकाळी 10 ते 12 वा. अनुसूचित जाती
जमातीच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा, दुपारी 12.00 वा. जिल्हाधिकारी व पोलिस
अधिक्षक यांचेशी चर्चा, संध्या. 4.00 वा. पुण्याकडे प्रयाण
* * * * * * * *
No comments:
Post a Comment