Thursday, 2 January 2014

उप प्रादेशिक परिवहन व पोलीस वाहतुक नियंत्रक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम


उप प्रादेशिक परिवहन व पोलीस वाहतुक नियंत्रक शाखा
यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम

          जळगाव, दि. 2 :- रस्ता सुरक्षा अभियान 2014 दि. 3 ते 17 जानेवारी 2014 या कालावधीत राबविण्यात येत असून कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा हस्ते करण्यात येणार आहे.
          उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिस वाहतुक नियंत्रक शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या   अभियानामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणा-या रिक्षा चालक / मालक मार्गदर्शन शिबीर, विशेष मोहीम तपासणी ड्रंकनड्राईव्ह , ओव्हरसीट, लेनकटींग, नो-पार्कींग, ओव्हरसीट, सिट बेल्ट, फँन्सी नंबर प्लेट, अंबरलाईट, लेन कंटींग, टेल लाईट, हेल्मेट, सिटबेल्ट, मोबाईल्स फोन, ड्रायव्हिंग स्कुल मालक / प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर, एस. टी. महामंडळ वाहन चालक सुरक्षित वाहन चालक प्रशिक्षण, रेल्वे मालधक्का येथे वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, वाहन चालक व वाहतुक पोलीस प्रथमोपचार व मार्गदर्शन शिबीर, खाजगी बस मालक / चालक प्रशिक्षण शिबीर, महाविद्यालयीन विद्याथी सुरक्षित ड्रायव्हिंग मार्गदर्शन शिबीर व प्रदर्शन, सि. त. ना. कर्की/ चोरवड येथे वाहन तपासणी  माहिती पत्रक वाटप व मोफत रेडीयम टेप लावण्याचा कार्यक्रम, वाहनांची मोफत प्रदुषण तपासणी करणे, सहकारी साखर कारखांना चोपडा, फैजपूर येथे ट्रॅक्टर, ट्रेलर व बैलगाडया यांना रिफ्लेक्टर लावणे, शहरातून हेल्मेट रॅलीचे आयोजन,  जैन इरिगेशन, जळगाव येथील कर्मचा-यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबीर, एकता टॅक्सी युनियन, अमळनेर यांचेतर्फे मार्गदर्शन शिबीर, टोलनाका, नशिराबाद  नेरी येथे वाहन चालक नेत्र तपासणी शिबीर व रस्ता सुरक्षा विषयक माहिती पत्रक वाटप, ट्रक टर्मीनस येथे ट्रकचालकास आरोग्य तपासणी तसेच मार्गदर्शन शिबीर व रिफ्लेक्टर लावणे, रस्ता सुरक्षा अभियान 2014 समारोप कार्यक्रम  आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात राबविण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी दिली आहे.


* * * * * * *

No comments:

Post a Comment