Wednesday, 8 May 2013

अपंग विदयार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी बॅकेत खाते उघडावे


            जळगांव, दि. 8 :-    शालांत पुर्व शिक्षण घेणा-या अपंग विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती    (प्री - मॅट्रीक) इयत्ता 1 ली ते 10 वी , शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणा-या अपंग विदयार्थ्याना शिष्यवृत्ती इयत्ता 11 वी ते पदवी पदव्युत्तर (पोस्ट - मॅट्रीक) वरील योजनांचा लाभ सन 2013 – 2014 व त्यापुढी कालावधीत मिळण्यासाठी  जवळच्या कोअर बॅकींगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बॅकेत त्यांचे बॅक खाते ( Student Account ) शून्य बॅलेन्सवर (Zero Balance) उघडणे आवश्यक असल्याने सर्व शिष्यवृत्ती लाभधारकांनी त्वरीत बॅक खाते उघडून घ्यावे तसेच शाळेच्या व महाविदयालयातील मुख्याध्यापकांनी स्वत:लक्ष घालुन खाते उघडून घेण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनाची असल्याने अपंग शिष्यवृत्ती लाभधारक लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  लाभार्थी अपंग शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास शाळाव्यवस्थापक व मुख्याध्यापक हे जबाबदार राहतील यांची नोंद घ्यावी, असे  जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment