जळगांव, दि. 18 :- बोरनार येथील अतिसारग्रस्त
रुग्णांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याच्या सूचना राज्याचे कृषी,
परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री श्री . गुलाबराव देवकर यांनी
दिल्या जळगांव तालुक्यातील बोरनार गावात काही दिवसांपासून अतिसाराची लागण झाल्याने
जिल्हा प्रशासनाने तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचारासाठी शिबीर लावले आहे.
आज
सकाळी श्री. देवकर यांनी बोरनार येथे जावून रुग्णांची भेट घेऊन होत असलेल्या
उपचारांची माहिती घेतली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस एम.
लाळीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा बॅकेचे संचालक वाल्म्कि
पाटील, दिलीप धनगर, नाना पाटील आदि उपस्थित होते.
शिबीरात
उपचारासाठी 4 पुरुष 5 महिला दाखल आहेत. डॉ. एस. एम. पवार, डॉ. विजय भगत, आरोग्य
सहाय्यक एस. ओ. महाजन व त्यांचे सहकारी त्यांना उपचारांसाठी तैनात आहेत. गेल्या 3 -
4 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या परिस्थित सुधारणा दिसत नसल्याने सर्वाना
जिल्हा रुग्णालयात स्थलांतरीत करण्याच्या सूचना श्री. देवकर यांनी यावेळी दिल्या.
म्हसावद
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदयकीय अधिका-यांची नेमणूक करावी अशी मागणी
ग्रामस्थांना केली. वैदयकीय अधिकारी नेमण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याची सूचना
श्री. देवकर यांनी संबंधितांना दिली.
शिबीरात
एकूण 416 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली 64 रुग्णांस अतिसाराची
लागण झाली होती. त्यातील दोन रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी
यापूर्वी पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी उपस्थित वैदयकिय अधिका-यांनी
दिली.
No comments:
Post a Comment