जळगांव, दि.27 : राज्य
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट
लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार
स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2012 या वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीसाठी
प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 मे 2013 असा आहे.
2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द
झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र
छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात
येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती
कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.
या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
http://dgipr.maharashtra.gov.inतसेचमहाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment