Wednesday, 22 May 2013

अत्याधुनिक ई. टी. एस भूमी मोजणी यंत्रांचे जिल्हाधिका-यांच्या हस्ते वाटप

      जळगांव, दि. 22 :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमीन मोजणी करण्यात येते पारंपारीक फलक यंत्रांच्या सहायाने मोजणी करतांना अनेक अडचणीस तोंड दयावे लागते काही मर्यादा देखील असल्याने मोजणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत राहातात विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत असे जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून भूमि अभिलेख कार्यालयासाठी उपलब्ध केलेल्या अनुदानातून 11 थेडोलाईट मशीन व 9 प्लॉटर वाटप आज सकाळी जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते जिल्हयातील उप अधीक्षक भूमिलेख कार्यालयास करण्यात आले या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी जिंतेद्र वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे आदि अधिकारी कार्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
              लेझर जंत्रज्ञानाचा वापर करुन ईलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीन तयार करण्यात आलेल्या आहे. कमी वेळ, कमी श्रमात, अचुक काम या मशीन व्दारे होणार असल्याने नागरीकांची चांगली सोय होणार आहेत. प्लॉटर मुळे अचूक सुबक जलद रितीने नकाशे नागरीकांना तयार करुन मिळणार आहे. एका मशीन साठी रु. 4 लाख 23 हजार 709 रुपये तर एका प्लॉटर साठी रु 2 लक्ष 48 हजार खर्च झालेला आहे. राज्याचे कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री श्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा विकास समितीतून 68 लक्ष 98 हजार 807 रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे या मशीन जिल्हयात उपलब्ध झाल्या असल्याचे प्रास्ताविकात प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भूषण मोहिते यांनी सागितले तसेच  यापूर्वी 4 मशीन जिल्हयात प्राप्त झालेल्या आहेत.

No comments:

Post a Comment