जळगांव, दि. 23 :- महाराष्ट्र औदयोगिक धोरण
2013 नुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद उदयोग घटकासाठी विशेष अभय योजना
(स्पेशल ॲम्नेस्टी स्कीम) शासन निर्णय क्र. एसआयसी – 2013 /
प्र.क्र.51/13/उदयोग-10, दिनांक 2 मे 2013 अन्वये जाहीर करण्यात आलेली आहे.
पुनरुज्जीवनक्ष्म नसलेल्या तसेच बंद घटकांची जमिनीसकटची स्थिर मालमत्ता
वापरात येणे अत्यंत जरुरीचे आहे. त्यामुळे जे उदयोग घटक खालील निकष पुर्ण करतील
अशा उदयोग घटकांना विशेष अभय योजनेव्दारे सुलभ निर्गमन (इझी एक्झिट ॲप्शन) पर्याय
उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार /
दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उदयोग घटक, रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियांच्या मार्गदर्शक
सूत्रानुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेला अदयोग घटक , उदयोग घटकाच्या व्यवस्थापनेत बदल
होवून उदयोग घटक व्यवस्थित चालू रहावे.
यासाठी वरील योजनेतंर्गत पात्र ठरणा-या उदयोग घटकाने राज्य शासनाची सर्व मुद्दलाची
रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व दंडव्याज माफ केले जाईल सदर योजना ही शासनाची सर्व
प्रकारची देणी म्हणजेच विक्रीकर विभाग, महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाच्या
थकबाकीची मुळ रक्कम, व्याज व दंडव्याज
इत्यादीसह जी रक्कम येईल ती थकबाकी समजण्यात येईल, सदर योजना निमशासकीय संस्था, शासकीय
कंपन्या व महामंडळे यांना देखील लागु असुन सदर योजना ही दिनांक 31 मार्च 2014
पर्यत सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तरी वरील प्रकारात मोडत असलेल्या
उदयोग घटकांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. डी. जे. बागडे, प्र.
महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र ,
जळगांव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment