जळगांव, दि. 7 :- गिरणा नदी काठावरील चाळीसगांव,
भडगांव व धरणगांव या तीन तालुक्यातील 282 गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा
प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा याकरिता सात के. टी. वेअर प्रस्तावित केलेले
आहेत. सदरच्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी याकरिता तापी सिंचन विकास महामंडळ व
जलविज्ञान शाखेने आठ दिवसात अहवाल देण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी
केली.
आज दुपारी शासकीय पद्मालय विश्रामगृह येथे गिरणा नदीवरील प्रस्तावीत के.
टी. वेअर करिता पाणी उपलब्धता प्रमाणपत्र
व नार्म्स बाबत पदाधिकारी व अधिका-यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ना. देवकर बोलत
होते. यावेळी आमदार दिलीप वाघ, आमदार राजीव देशमुख, तापी सिंचन मंडळाचे
कार्यकारी संचालक श्री. शिंदे, अधिक्षक
अभियंता व्ही. डी. पाटील, जलविज्ञान शाखेचे कार्यकारी अभियंता श्री. बागुल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी
अभियंता आर. सी. जैन आदि उपस्थित होते.
श्री. देवकर म्हणाले धरणगांव (1),
भडगांव (4) व चाळीसगांव (2) या तालुक्यातील
सातही गांवे के. टी. वेअरचे प्रस्ताव मंजूर होऊन त्वरित काम सुरु होणे
आवश्यक आहे. सदरचे बंधारे पूर्ण झाल्यास
गिरणा काठावरील गावांचा पाणी समस्या दूर
होईल असे त्यांनी सांगितले. त्याकरिता तापी विकास महामंडळाने सदरचे बंधारे विविध
नॉर्म्स मध्ये कसे बसतील हे पाहून बंधा-यांची अंदाजीत किंमत काढावी असे श्री.
देवकर यांनी सांगितले.
तापी विकास महामंडळाच्या अधिका-यांनी सदरचे प्रोजेक्ट हे पायलट प्रोजेक्ट
म्हणून राबविण्याची सूचना आमदार राजीव देशमुख यांनी केली.
लहान बंधारे केल्यास पाण्याची उपयोगिता जास्त राहत नाही. किमान दोन अडीच टी
एम सीचे बंधारे बांधणे आवश्यक आहे. परंतू सदराच्या बंधा-यांकरिता राज्यशासनाची
मंजूरीची गरज आहे, अशी माहिती अधिक्षक अभियंता व्ही. डी. पाटील यांनी दिली. तसेच
सदर सात व्ही. के. टी. वेअरचे सिंचन
क्षेत्र 250 हेक्टर पेक्षा कमी दाखविल्यास
मंजुरी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. या करिता एका बंधा-याची आठवडाभरात किंमत
काढून दिली जाईल व त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करता येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक श्री. शिंदे, अभियंता बागूल अक्षिक्षक अभियंता
व्ही. डी. पाटील आदिनी के. टी. वेअरचे नॉर्म्स
अंदाजित किंमत, पाणी साठवण क्षमता, सिंचन स्त्रोत आदिबाबत आपले विचार
मांडले. तसेच वरील सातही के. टी. वेअर
करिता पाणी उपलब्धता प्रमापणपत्राची अडचण नसल्याची माहिती अभियंत्यांनी यावेळी
दिली.
सदर के.
टी. वेअर बाबत दिनांक. 17 मे 2013 रोजी दुपारी 3 वाजता पद्मालय विश्रामगृह
येथे पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली
पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment