जळगांव, दि. 17 :- जिल्हयातील विविध खात्याच्या
महिला अधिका-यांनी गर्भलिंग तपासणीस प्रतिबंध करण्यासाठी दक्ष राहून होणा-या
गर्भलिंग तपासणीस प्रतिबंध घालण्याच्या कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात
आलेल्या गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र जिल्हा दक्षता पथकाच्या आढावा
बैठकीत केले.
जिल्हा
दक्षता पथकाच्या आजच्या आढावा बैठकीत जिल्हयातील सर्व सामुचित प्राधिकारी यांनी
केलेल्या कामाचा आढावा तसेच जिल्हा व तालुका सल्लागार समितीच्या कामाचा आढावा
घेण्यात आला. यावेळी www.amchimalgi.gov.in
ही वेबसाईट सुरु करण्यात आली असून टोलफ्री क्रमांक 18002334475 सुरु करण्यात आले
असून नागरिकांनी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून घडणा-या गैर प्रकारांची माहिती
वेबसाईट व टोलफ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहन करण्यात आले. स्त्रीभ्रुण हत्या टाळण्याच्या
अनुषंगाने सामाजिक संस्थाच्या सहभागाने जनप्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम
राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यांत आली.
बैठकीस
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल उगले, मनपा आयुक्त संजय
कापडणीस, अपर पोलिस अधिक्षक एन अंबीका, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाळीकर, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हयातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार,
गट विकास अधिकारी, न. पा. चे मुख्याधिकारी व आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment