जळगांव, दि. 8 :- जिल्हा उपनिबंधक , सहकारी
संस्था, जळगांव या कार्यालयातील संगणक, पिंटर्स इ. दुरुस्ती व देखभालीचे कामकाज सन
2013 – 2014 या एक वर्षाचे कालावधीसाठी कराराने दयावयाचे असून त्यासाठी संबंधित
व्यक्ती/ दुकानदार/ कंपनी कडून मोहोरबंद निविदा मागविणेत आल्या आहेत.
सदरची निवीदा कार्यालयातील एकुण 11 संगणक,
08 पिंटर्स, 03 स्कॅनर्स च्या दुरुस्ती व देखभालीसाठी दयावयाची आहे. सदरच्या
निविदेत दर प्रत्येकी संगणक / पिंटर्स / स्कॅनर्स असा दर्शविण्यात यावा
सदरच्या मोहोरबंद निविदा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत,
पहिला माळा, टप्पा दुसरा, जळगांव या पत्यावर सदरचे निवेदन प्रसिध्द झाल्याचे
तारखेपासून सात दिवसाचे आत सादर कराव्यात असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment