Monday, 20 May 2013

जळगांव जिल्हयात जिल्हास्तर क्रीडा शाळा सुरु करण्याचे आवाहन



          जळगांव, दि. 20 :- ग्रामीण भागातील क्रीडा नैपुण्यप्राप्‍त खेळाडूंना शोधून ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टीने त्याच्या क्रीडा कौशल्याचा विकास साधणे करिता अशा क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा शाळांमध्ये प्रवेशित करणेसाठी शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हयात जिल्हास्तर क्रीडा शाळा (District Level Sports School - DLSS) येत्या 4-5 वर्षात स्थापन करावयाची आहे. त्याचबरोबर भारतात राज्यस्तरावर  25 उच्च कार्यमान केंद्र (High Performance Centres) देखील स्थापन करावयाची आहेत.
           पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान अंतर्गत होणा-या ग्रामीण क्रीडा स्पर्धेमधून युवा क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडू शोधून जिल्हास्तर क्रीडा शाळेमध्ये दाखल करुन व उच्च दर्जाची क्रीडा प्रशिक्षण देवून त्यांना राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तयार करण्याचे कार्य या शाळांमधून करण्यात येणार आहे.
           जिल्हास्तर क्रीडा शाळांना ॲथलेटिक्स, हॉकी / फुटबॉल, इनडोअर हॉल, टेनिस व्हॉलिबॉल, बास्केटबॉल इ. प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा शाळा कार्यरत करण्याकरिता 10 ते 12 एकर मोकळी जागा आवश्यक आहे.
         क्रीडा नैपुण्यप्राप्त खेळाडूंना अशा शाळांमध्ये प्रवेश देवून खेळाबरोबरच  त्यांच्या शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येणार आहे. जिल्हास्तर क्रीडा शाळा प्रत्येक जिल्हयात सुरु करण्यासाठी पुढील सुविधा असणा-या शाळांचा प्रामुख्याने विचार करण्यात येईल.
          कमीत कमी  10 ते 12 एकर मोकळी जागा, उच्च माध्यमिकपर्यत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या शाळा, मुले / मुली / मुले - मुलींसाठीची शाळा , वसतीगृह सुविधा – कमीत कमी 1000 विदयार्थी राहू शकतील ( मुले व मुली ) वरील सुविधा असणा-या या शासकीय शाळा / संस्था / महनगरपालिकेच्या शाळा / जि.प. शाळा अर्ज करणेस पात्र असतील.
        तरी जळगांव जिल्हयातील ज्या शाळा / संस्थांना शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी दि 23 मे 2013 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन आवश्यक त्या कागदपत्रांची  पूर्तता करावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जळगांव यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment