जळगांव, 22 :- या निवेदनाव्दारे अनु. जाती, अनु.
जमाती, वि. जा. भ. ज, वि. मा. प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय , अनाथ व अपंग
या प्रवर्गाच्या बाहेर गावाहून ये – जा करुन शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना कळविण्यात
येते की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असणा-या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चोपडा रोड, अंमळनेर या
वसतिगृहात सन 2013 – 14 या वर्षासाठी वर नमुद मागावर्गीय विदयार्थ्यांना
गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहे.
वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या
विदयार्थ्यांनी अंतिम परिक्षेचा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत विहीत
नमुन्यातील प्रवेश अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रवेश अर्ज व प्रवेशाच्या अटी व नियम
वसतिगृहाच्या कार्यालयात पाहावयास मिळतील.
वसतिगृहात प्रवेश दिलेल्या
विदयार्थ्यांना निवास, भोजन, लेखनसाहित्य, गणवेश इ. सुविधा विनामुल्य पुरविल्या
जातात.
तरी वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या
विदयार्थ्यांनी गृहपाल डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चोपडा रोड, गोशाळेसमोर, अमळनेर, जि.
जळगांव येथे संपर्क साधावा असे एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment