म्हसावद रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात अडथळा आणू नये
: पालकमंत्री गुलाबराव देवकर
जळगांव, दि. 4- म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी ज्या
लोकांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यापैकी काही लोकांचे आर्थिक नुकसान
झालेले आहे. या लोकांच्या संपादित केलेल्या जमिनीला अकृषिक दराने मोबदला मिळणेसाठी
प्रयत्न केले जातील. त्यामुळे या लोकांनी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात
कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणण्याचे
आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
आज सकाळी शासकीय पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित रेल्वे
उड्डाण पुलाच्या संपादित जमिनीसाठी अकृषिक मोबदला मिळण्याबाबतच्या बैठकीत श्री.
देवकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, उपजिल्हाधिकारी जितेंद्र
वाघ, विशेष भू-संपादन अधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मीक
पाटील, दिलीप धनगर, मंगला पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
संजय सोनवणे, म्हसावद येथील लाभार्थी पार्श्वनाथ बडगुजर आदि उपस्थित होते.
श्री. देवकर म्हणाले, म्हसावद रेल्वे उड्डाण पुलासाठी
संपादित केलेल्या कोणत्याही जमीन मालकाचे आर्थिक नुकसान होऊ दिले जाणार नाही.
परंतू सदर संपादित जमीनीच्या निवाडा जाहीर झाला असल्याने प्रशासन त्यात फेरफार करु
शकत नाही. त्यामुळे उर्वरित चारही जमीन मालकांनी त्यांच्या संपादित जमीनीसाठी
बाजारभावाने मोबदला मिळावा याकरिता
कोर्टात जावे त्यातून त्यांना न्याय मिळेल . परंतू उड्डाण पुलाचे काम सुरळितपणे
सुरु राहावे याची दक्षता घ्यावी या कामात
कोणीही अडथळा आणू नये असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने म्हसावद येथील जमीन मालक श्री. पार्श्वनाथ
बडगुजर यांची 24 आर जमीन प्रति आर 1 लाख
20 हजार रुपये कृषी दराने संपादित केलेली
आहे. परंतू तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी यांनी काही जमीन मालकांना प्रती आर 1 लाख 90 हजार
रुपयाचा अकृषिक दराने मोबदला जाहीर केलेला आहे. त्यामुळै श्री. बडगुजर व इतर तीन
शेतक-यांनी वरीलप्रमाणे अकृषिक दराने मोबदला देण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली
आहे. या चार व्यक्तीची एकूण 64 आर जमीन संपादित झालेली आहे. त्यामुळे सदर 64 आर
जमीनीला अकृषिक दराने मोबदला मंजूर झाल्यास शासनाकडून लोकांना सुमारे 38 लाख रुपये
अधिकचा भार पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
* * * * * * *
No comments:
Post a Comment