Wednesday, 8 May 2013

उन्हाळी हंगाम 2012 / 2013 मधील हंगामी पिकांसाठी पाणी अर्ज सादर करणे बाबत

          जळगांव, दि. 8 :-  जिल्हयातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, ज्या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा आहे अशा प्रकल्पांवरील पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागाईतदारांना कळविण्यात येते की, दि. 1 मार्च 2013 पासून सुरु होणारा उन्हाळी हंगाम सन 2012 / 2013 मध्ये भुसार / अन्नधान्य / चारा / डाळी/ कपाशी/ भुईमुंग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना मध्यम व लघु प्रकल्पातील पिण्याचे पाण्याचे आरक्षण वजा जाता सिंचनासाठी शिल्लक पाण्याचा उपलब्धते नुसार मंजुरी देण्याचे ठरविले आहे.
          तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संमतीपत्रकासह संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 15 एप्रिल 2013 पर्यंत सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत देण्याचे करावे.
         पाणी अर्ज स्विकारण्याच्या शर्ती खालीलप्रमाणे
         पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल, बागाईतदारांनी आपआपल्या शेतचा-या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी / ना मंजुरी चा विचार करण्यात येईल, मंजुरी व पाणी पुरवठयाबाबत अन्नधान्ये / भुसार / चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात देण्यात येईल, पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये, थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व 12 % जादा आकारासह कृपया भरणे आवश्यक आहे, पाणी नाश / पाळी नसतांना पाणी घेणे / मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजवणे/ विहिरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे / व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागाईतदारांचे नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यांत येईल, टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देत येणार नाही.
       जाहिर निवेदना मध्ये नमुद केलेल्या विहीत दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्दी करण्यात येईल, लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दितील विहीरीं बाबत 7 (ब) नमुना मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजवू नये , हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल.   

No comments:

Post a Comment