Friday, 31 May 2013

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय ठेऊन कार्य करावे- जिल्हाधिकारी राजूरकर



               जळगांव, दि. 31 :- जिल्हयात अतिवृष्टीमुळे निर्माण होणा-या आपतकालीन प्रसंगी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, संरक्षण विभाग व इतर विभागांनी आपसात योग्य समन्वय ठेऊन परिस्थितीचा यशस्वीपणे मुकाबला करावा असे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी आज मान्सूनपूर्व आपतकालीन पूर्व तयारी बैठकीत केले.
                नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मान्सूनपूर्व नियोजन व प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी करावयाच्या उपाययोजना आणि आपत्ती नंतरच्या काळात पार पाडावयाची कामे याबाबत जिल्हयाती विविध यंत्रणांनी केलेल्या नियोजनाचे सखोल आढावा जिल्हाधिका-यांना आज घेतला यात प्रामुख्याने पाटबंधारे विभाग, जळगांव महानगर पालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, होमगार्ड, जिल्हा शल्यचिकित्सक, राज्य विद्युत मंडळ, जिल्हा प्रकल्प अधिकारी, मिलीटरी स्टेशन भुसावळ यांनी आपल्या विभागांशी संबंधीत पूर्व तयारी बाबत  माहिती दिली.
              बैठकीत आपत्ती निवारणाचे सादरीकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ यांनी केले व प्रास्ताविक निवासी उपजिल्हधिकारी धनंजय निकम यांनी केले. बैठकीस जिल्हा आपत्ती निवारण समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा पोलिस प्रमुख एस. जयकुमार , होमगार्ड समादेशक डॉ. राजेंद्र भालोदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन कुलकर्णी, मिलीटरी स्टेशन भुसावळचे उबगणे, पाटबंधारे विभागाचे अभियंता पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड, जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व नगर पालिकांचे मुख्यधिकारी उप‍स्थित होते.

No comments:

Post a Comment