जळगांव, दि. 21 :- भारताचे माजी
पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्य तिथी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो आज
सकाळी 11 . 00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. ज्ञानेश्वर
राजूरकर यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली
वाहिली यानंतर उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनी पुष्पाजंली अर्पण केली.
जिल्हाधिकारी श्री राजूरकर यांनी
अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिसांचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा दिली.
प्रतिज्ञा
आम्ही भारताचे नागरिक आपल्या देशाच्या
अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरे विषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे सर्व प्रकारच्या
दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक
प्रतिज्ञा करीत आहोत आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवबंधू मध्ये शांती,
सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्ये
धोकयात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विकास
गद्रे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जितेंद्र वाघ, स्वाती थविल, दीपमाला चौरे,
तहसिलदार हेमलता बढे, उषाराणी देवगुणे, नगरपालिका विभागाचे डी पी ओ बाविस्कर आदी
अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment