जळगांव, दि. 13 :- जिल्हयातील सर्व
औषध दुकानदारांना कळविण्यांत येते की, औषधे व सौदर्य प्रसाधने कायदया अंतर्गत
आपल्या दुकानात रजिस्टर फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी असे
निदर्शनास आले की, फार्मासिस्ट हे दुकानात
गैरहजर राहतात व औषध विक्री सुरु असते. अशा वेळी औषण निरीक्षक नियमित तपासणीकरीता
गेले असता, काहीतरी जुजबी कारणे सांगुन पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात.
प्रत्यक्षात ते रजिस्टर फार्मासिस्ट इतरत्र काम करतात किंवा बाहेर राहतात असे
निदर्शनास आले. तरी सर्व केमिस्ट बांधवाना पुनश्च इशारा देण्यात येतो की, असे
आढळल्यास त्या दुकान मालका विरुध्द व रजिस्टर फार्मासिस्ट विरुध्द शासकीय
कार्यालयास खोटे कागदपत्र दिल्याबाबत भारतीय दंड संहिता मधील कलम 420 नुसार
फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच पेढीचे परवाने रद्द करण्यात येतील
अशावेळी राजकीय मान्यवरांकडून दुरध्वनी केल्यास तो राजकीय दबावतंत्र धरल्या जाईल.
तरी अशा दुकानदाराने स्वत:हून त्यांचे परवाने कार्यालयात विना विलंब जमा करावे.
असे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जळगांव यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment