Tuesday, 12 March 2013

प्रशासनामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जनशताब्दी वर्ष सांगता समारोह संपन्न

             जळगांव. दि. 12 :- राज्यात सर्वत्र जिल्हास्तरावर दि. 13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 या कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येऊन जळगांव जिल्हा प्रशासनामार्फत आज अल्पबचत भवनात जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोह संपन्न झाला.
            यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सदर सांगता समारोह निमित्त डॉ. तुषार चांदवडकर यांचे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे व्याख्यान आयोजित केले होते.
            डॉ. चांडवकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यावर प्रभात असलेली व्यक्तीमत्वाची माहिती सांगून स्व. चव्हाण यांच्या आई विठोबाई व पत्नी वेणुताई यांची विचारसणी उपस्थिंतासमोर मांडली तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचा जाणता राजा म्हणून स्व. यशवंतरावांनी बजावलेली भूमिका व लोककल्याणकारी  निर्णयांचा पट डॉ.  चांदवडकर यांनी यावेळी मांडला.
            महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांना राजकीय  सत्तेमध्ये सहभागी होता यावे म्हणून यशवंतरावांनी सत्तेचे विकेंद्रीकरण सिध्दांताची अंमलबजावणी प्रभावीपणे घडवून आणली. तसेच साहित्यिक व कलाकरांप्रती अत्यंत अदर व प्रेम व्यक्त करुन साहित्य आणि संस्कृती मंडळ आदिची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रा. चांदवडकर यांनी व्याख्यातून दिली.
            स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सांगता समारोह निमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. चांदवडकर यांनी यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व व त्यांनी सर्वसामान्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा पट, तसेच लोकहित दक्ष, जाणता राजा म्हणून केलेली कामगिरी उपस्थितांसमोर मांडली.
            यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लळीकर आदिसह सर्व शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment